आपणा सर्वांच्या सहकार्याने व विश्वासाच्या बळावर देवगिरी अर्बन ही आपली संस्था गेल्या चार वर्षापासून आपल्या सेवेत कार्यरत आहे. संस्था भविष्याचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सभासदांना अचूक, जलद, सर्वोत्तम व सुरक्षित बँकिंग सुविधा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. अल्पवधीतच संस्थेने २५ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. हे केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच साध्य झालेले आहे. सहकार क्षेत्रामध्ये केवळ आर्थिक व्यवसायापुरतेच सीमित न राहता सामाजिक जाणीव आपल्या विचारातून आणि कृतीतून जोपासत संस्थेने जवळपास ६००० हून अधिक लोकांच्या नेत्र तपासण्या मोफत करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले. तसेच गरजू व आर्थिक दृष्ट्या असमर्थ वृद्धांचा ऑपरेशनचा खर्च सुद्धा संस्थेच्या वतीने करण्यात आला. संस्था पुरवत असलेल्या अचूक, जलद, सर्वोत्तम व सुरक्षित बँकिंग सेवेमुळे आज हजारो सभासदांच्या मनात घर करून आहे. सभासदांना उत्तरोत्तर उत्तम बँकिंग सेवा प्रदान करण्यात यावी या उद्देशाने संस्थेचे स्थलांतर प्रशस्त व सुसज्ज जागेत झाले आहे.