डिजीटल शिक्षण ही काळाची गरज आहे. हिच गरज ओळखुन जि. प. शाळा, साळेगाव येथिल विद्यार्थी यांच्या डिजीटल शिक्षणासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन देवगिरी अर्बन तर्फे स्मार्ट टि. व्ही. देण्यात आला. यावेळी सर्व श्री. देवगिरी अर्बन चे चेअरमन दिपक कदम, सोनवणे सर, जाधव सर, ग्रामसेवक वाघमारे साहेब, कमलाकर कदम, नितीन राठोड, भास्कर चोपडे, शरद कदम, आसाराम कदम आदी उपस्थित होते